जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सैनिक पत्नीविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल विधान परिषदेचे भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना करण्यात आलेले दीड वर्षाचे निलंबन विधिमंडळाच्या समितीने बुधवारी अखेर मागे घेतले आहे. यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी कडाडून टीका केलीय.
मोदींविरूद्ध बोलणा-यांना निलंबित करता मग जवानांविरूद्ध बोलणाऱ्यांना परीचारक का नाही निलंबित करता. असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय. ‘सीमेवर जवान शहीद होतायेत आणि भाजप सरकार परीचारक यांचे निलंबन मागे घेतायेत. याच परिचारिकांनी जवानांच्या कुटुंबीयांचा अपमान केला होता. त्याचे निलंबन कसं मागे घेता. त्याची गाढवा वरून धिंड काढली पाहीजे.’ असंही उद्धव ठाकरेंनी म्हंटलंय
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.