अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून निकालाचे वाचन करण्यात आले. धनंजय चंद्रचूड यांनी २० मि,निटे निकालाचे वाचन केले. यावेळी सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाची मागणी मान्य करत संबंधित प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केले आहे. काही गोष्टींची उत्तर अपूर्ण राहिली आहेत.
नबाम रेबिया प्रकरणात सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नाहीत. त्यामुळे हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केले. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कृतीवर कडक ताशेरे ओढले. राज्यपालांनी बोलावलेली बहुमत चाचणी ही चुकीची होती, असे स्पष्ट मत निकालात मांडण्यात आले. यावेळी सरन्यायाधीशांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बहुमत चाचणीचे निर्देश दिले होते. तेव्हाच्या सगळ्या घडामोडी पाहता उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पण उद्धव ठाकरे यांची तीच कृती चुकीची ठरल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने मांडलं आहे. “सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंचा राजीनामा परत घेऊ शकत नाही. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणले असते, असे मोठे निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नोंदवले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.