उद्धव ठाकरेंची आगपाखड

उद्धव ठाकरेंची आगपाखड

मराठी भाषा दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह याबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर आगपाखड केली आहे.

सोमवारी, २७ फेब्रुवारी २०१४ रोजी, मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे उद्धव गटाकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी, ‘शिवसेना म्हणजे फक्त नाव किंवा चिन्ह नाही केवळ, धनुष्यबाण म्हणजे शिवसेना नाही तर शिवसेना प्रमुखांनी पेरलेले धगधगते विचार म्हणजे शिवसेना आहे आणि ते कोणीही आमच्याकडून काढून घेऊ शकत नाही’, असे वक्तव्य केले आहे.
‘शिवसेना आमचीच ‘सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना निवडणूक आयोगाने मध्ये चोंबडेपणा करण्याची गरज नव्हती’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर आगपाखड केली आहे. निवडणूक आयोगातल्या पराभवानंतर ही प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version