आज रात्री 12 पासून ‘या’ गोष्टी बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा

आज रात्री 12 पासून ‘या’ गोष्टी बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा, महाविद्यालयं बंद करण्याची घोषणा केली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड,नागपूरमधील जिम, जलतरण तलाव, सिनेमा हॉल बंद करण्यात येणार आहेत. आज रात्री 12 वाजल्यापासून या आदेशांची अमलबजावणी होईल.

खासगी कंपन्यांनीही शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासं सांगावं, असंही मुख्यमंत्र्यांनी सूचवलं आहे. तसंच परीक्षा उशिरा घेण्याचा विचार केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं.

अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळावी असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय.लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ नये म्हणून मुंबईमध्ये असा निर्णय न घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तरीही अनेक शाळा स्वतःहून बंद ठेवत असल्याचं त्यांनी म्हटलंय. लोकांच्या मनात भीती निर्माण न होऊ देण्याची जबाबदारी आपली असल्याचं त्यांनी म्हटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version