रिलायन्सच्या जिओ फायबरविरोधात शिवसेना केबलमालकांच्या पाठीशी – उद्धव ठाकरे

रिलायन्सच्या जिओ फायबरविरोधात शिवसेना केबलमालकांच्या पाठीशी – उद्धव ठाकरे

जिओ फायबरविरोधात मुंबईसह राज्यभरातील केबल मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या केबल मालकांच्या संघटनेने आयोजित केलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी रिलायन्सवर जोरदार टीका केली आहे.

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे या कार्यक्रमात?

जिओ फायबरमुळे केबलचालकांना अस्वस्थ वाटणे सहाजिक आहे. केबल चालकांनी मेहनत करून व्यवसाय उभे केले. ते असे उद्ध्वस्त होऊ देणार नाही. इंटरनेट फुकट वाटता, मग रेशनही फुकट वाटा.

मोफतच द्यायचं असेल 50 वर्षांचा करार करून मोफत सेवा वाटा असा सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

इंटरनेट सारख्या सेवा पहिल्यांदा फुकट वाटायच्या, काही महिन्यांत प्रतिस्पर्धीनी माघार घेतल्यानंतर अव्वाच्या सव्वा दर वाढवायचे अशी रिलायन्स पद्धत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मोफत द्यायचे असेल 50 वर्षांचा करार करून मोफत सेवा वाटा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना केबलचालकांच्या पाठीशी राहणार. भाजी-भाकरी डिजिटली कशी देता येईल?

लोकांच्या ताटातली भाजी-भाकरी काढून घेतल्यावर डिजिटलने पोट कसे भरेल?

कोणाच्या व्यवसाय करण्यास आमचा विरोध नाही. आणखी 10 जणांनी यावे पण कोणाच्या पोटावर पाय आणू नये, असे यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.

केबल मालकांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहणार. 

शिवसेना तुमच्यासारख्या सामान्यांवरील अन्यायासाठीच उभी राहीली आहे. यामुळे तुमच्यावरील अन्याय दूर करणारच.

प्रत्येक गोष्ट आम्ही संघर्षातून मिळविणार आहोत, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version