सामनामधून मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल

सामनामधून मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात जपानचे पंतप्रधान आबे यांनी मोदी यांना मेजवानी दिली. त्या मेजवानीत आबे यांनी मोदींना प्लॅस्टिकच्या काड्यांनी म्हणजे ‘चॉपस्टिक’च्या सहाय्याने कसे खावे याचे प्रशिक्षण दिले, यावरुन आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

इकडे देशात अराजकसदृश स्थिती आहे. देशाच्या प्रमुख स्तंभांना ‘चॉपस्टिक’च्या काड्यांइतकीही किंमत उरलेली नाही. मोदी जपानमध्ये चॉपस्टिक काड्यांनी कसे खायचे याचे धडे घेत आहेत.

इकडे हिंदुस्थानी राज्यव्यवस्थेच्या 4 प्रमुख स्तंभांच्याही आता ‘काड्या’च झाल्या आहेत. ‘टांगा पलटी, घोडे फरार’ अशी एकंदरीत अवस्था दिल्लीतील राज्यव्यवस्थेची झालेली दिसते.

‘अराजक’ किंवा ‘यादवी’ शब्दांची धार बोथट वाटावी अशा घटना राष्ट्रीय स्तरावर घडताना दिसत आहेत. आधी आमच्या न्यायव्यवस्थेत बंडाळी माजली.

सर्वोच्च न्यायालयाच्या 4 प्रमुख न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन बंडाच्या तोफा उडवल्या. आता ‘सीबीआय’मध्ये तशाच बंडाच्या हादऱ्यांनी कल्लोळ माजला आहे. या भाषेत टीका करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version