उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यावर, फडतूस कोण हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे पुन्हा सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले असून नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस हे काडतूस आहेत आणि उद्धव ठाकरे हे फडतूस आहेत, अशी टीका भाजपाचे नेते प्रमोद जठार यांनी केली आहे. प्रमोद जठर म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस हे फडतूस नाहीत काडतूस आहेत. तुमच्या हाताखालचे दोन मंत्री तुरुंगात होते. त्यामुळे किमान आपल्याखाली वाकून पाहण्याची गरज होती, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक काडतूस वाजलं तर शिवसेनेला भगदाड पडलं. तर, देवेंद्र फडणवीस नावाचं काडतूस वाजलं तर उद्धव ठाकरे तुमची उरलीसुरलेली अब्रू चव्हाट्यावर येईल, असा जोरदार हल्लाबोल भाजपचे प्रदेशाची व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे.’
'देवेंद्र फडणवीस काडतूस आहेत, उद्धव ठाकरे फडतूस आहेत'
भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांची टीका#Jaimaharashtranews #Marathinews #Maharashtra @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @OfficeofUT @PramodJathar #pramodjathar @AUThackeray pic.twitter.com/iou9j7qaXS — JAI MAHARASHTRA NEWS (@jaimaharashtran) April 5, 2023
‘इतक्या वर्षांचा उद्धव यांचा कारभार पाहिल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. खुर्चीकरता लाखघोटेपणा करता, त्यामुळे फडतूस कोणाला म्हणायचे हे तुम्हीच बघा. दोन मंत्री तुरुंगात गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत, जे मुख्यमंत्री त्याच मंत्र्यांभोवती लाळ घोटत असतात, त्यांना बोलण्याचा अधिकार काय?, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला आहे.’
‘फडतूस गृहमंत्री राज्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय,’ असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.