शुभेच्छांचं राजकारण…

शुभेच्छांचं राजकारण…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ५८ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना अनेकजण शुभेच्छा देत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य आणि आनंद मिळो’.

राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उघडपणे भाजपा आणि नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंशी जवळीक करण्याचा राहुल गांधी प्रयत्न करत असल्याची शंकाही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version