उद्धव देशाबाहेर, पवार वर्षावर

उद्धव देशाबाहेर, पवार वर्षावर

मुंबई, २ जून २०२३, प्रतिनिधी :  महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्याच्या घडीला घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पोहचले आहेत. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काही कामानिमित्ताने परदेशात गेले आहेत. तर दुसरीकडे अचानक शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्रात सत्तांतर घडून जवळपास १० महिन्यांचा कालावधी झाला आहे. या दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली नाही. पण आज अचानक शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला पोहचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. मात्र, या भेटीमागील कारण समोर आले आहे. शरद पवार अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्यात आले. या आमंत्रणासाठी पवार स्वत: वर्षा बंगल्यावर दाखल झालेहोते.

देशातील सर्व विरोधी पक्षांची एकमोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शरद पवार पुढाकार घेताना दिसत आहेत. शरद पवार यांनी अनेकदा भाजप-शिंदे सरकारवर उघडपणे टीका केली आहे. मात्र उद्धव ठाकरे परदेशात गेलेले असताना शरद पवार यांनी अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. मात्र, या भेटीमागील कारण समोर आले आहे. शरद पवार अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्यात आले. या आमंत्रणासाठी पवार स्वत: वर्षा बंगल्यावर दाखल झालेहोते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version