उद्धव यांचं कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष, शिंदे धावले मदतीला

उद्धव यांचं कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष, शिंदे धावले मदतीला

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हातातून निसटले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याचा अधिकार मिळाला. उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हिसकावून घेतली आणि दोन्ही गटामध्ये वाट विकोपाला गेला. असे असतानाही, सोलापूरमध्ये माणुसकी अद्याप जिवंत असणारी घटना घडली आहे. पैसे भरत नाहीत तोवर मृतदेह देणार नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कार्यलयातून फोन येताच सूत्र फिरली आणि मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

पंढरपुरमधील उद्धव गटाचे माजी शहर प्रमुख संदीप केंदळे यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. पांढरी कावीळ झाल्याने केंदळे यांना सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर केंदळे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयाने अडीच लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र, केंदळे कुटुंबियाला इतके पैसे भरणे शक्य नव्हते. केंदळे यांच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारानेदेखील मृतदेह घेण्यासाठी धडपड केली. मात्र, काहीही मदत झाली नाही.

त्यानंतर, केंदळे यांच्या मित्राने शिवसेना वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला. तर चिवटे यांनी सोलापूर रुग्णालय प्रशासन आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना फोन करून केंदळे कुटुंबियाची अडचण दूर करण्यास सांगितले. तर रुग्णालयाचे संपूर्ण बील भरणार असल्याची हमी सुद्धा चिवटे यांनी दिली. तसेच, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन असल्याचेही सांगितले. मात्र, रुग्णालयातील कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हते.

यावेळी, चिवटे म्हणाले, मी शिवसैनिक बोलत आहे हे लक्षात घ्या. तुम्ही बाळासाहेबांच्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना त्रास देत आहात. असे म्हटल्यावर रुग्णालय प्रशासन नमले आणि काही तासांमध्ये रुग्णालयाने मृतदेह केंदळे यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला. दरम्यान, चिवटे आणि रुग्णालय प्रशासनाचे संभाषण उद्धव गटाचे नेते ऐकत होते. आणि हे ऐकल्यावर त्यांचेही अश्रू अनावर झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version