केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शिवसेना ज्या पेटत्या मशालीने शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करणार होते. पण ही मशाल फक्त पुण्यातील पोटनिवडणुकीपर्यंतंच वापरता येणार आहे. जर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह हवं असेल तर परत निवडणूक आयोगाकडे जावे लागणार आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानुसार आता उद्धव ठाकरे गटाला‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे. ठाकरे गटाला २६ फेब्रुवारीपर्यंतच या चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरण्याची मुदत आहे. याविषयीचे निर्देशच निवडणूक आयोगाने दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह तात्पुरते दिले होते. चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपर्यंतच म्हणजेच २६ फेब्रुवारीपर्यंतच ठाकरे गटाला पक्षाचं हे नाव आणि चिन्ह वापरता येणार आहे.
त्यानंतर त्यांना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. हे नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी किंवा नवीन नाव आणि चिन्ह घेण्यासाठी ठाकरे गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावे लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.