‘उद्धव गटाचे अद्वय हिरे यांचा दादा भुसेंना दे धक्का

‘उद्धव गटाचे अद्वय हिरे यांचा दादा भुसेंना दे धक्का

आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असलेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांत महाविकास आघाडीचा झंझावात राहिला आहे. भाजप आणि शिंदे गटाने बाजार समित्यांमध्ये वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांची जादू चालली नाही. मालेगावमध्ये शिंदे गटाचे प्रमुख नेते तथा पालकमंत्री दादा भुसे यांना मोठा धक्का बसला आहे. तेथे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या महाविकास आघाडीच्या पॅनलने पालकमंत्री भुसे यांची सत्ता उलथून लावली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली आपलं पॅनल तयार झालं. इकडे उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटात नव्याने दाखल झालेल्या अद्वय हिरे यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल उभे करत रणशिंग फुंकले. मात्र मंत्री असलेल्या दादा भुसे यांचे पारडे जड होते. अनेक वर्षांपासून दादा भुसे यांनी मालेगाव बाजार समितीवर झेंडा फडकवला होता. त्यामुळे मालेगाव बाजार समितीला सुरुंग लावणे अवघड होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी हिरेंच्या पाठीवर ठेवलेला हात मालेगाव बाजार समितीवर उभा राहिला. आणि पंधरा वर्षांपासूनच्या सत्तेला पायउतार केले.

एका जागेवर पालकमंत्री दादा भुसे यांच्या आपलं पॅनलचे उमेदवार चंद्रकांत शेवाळे निवडून आले आहेत. एकूण अठरा जागांपैकी अकरा जागांची मतमोजणी पूर्ण झाली असून सात जागांची मतमोजणी सुरू आहे. ग्रामपंचायत व्यापारी व हमाल मापारी गटात मतमोजणी अद्याप सुरू आहे. मात्र आतापर्यंतच्या निकालाने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना होम पीचवर मोठा धक्का बसला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version