‘उदय सामंत देखील पवारांच्या भेटीला’

‘उदय सामंत देखील पवारांच्या भेटीला’

काँग्रेस ज्या उद्योगपती गौतम अदानी यांना सातत्याने लक्ष्य करत आहे. त्याच गौतम अदानी यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. त्यानंतर आज शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, या भेटीनंतर ही राजकीय भेट नव्हती. या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही. तसे कोणीही करु नये, असे उदय सामंत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांचे रंगकर्मी नाटक समूह पॅनल विजयी ठरले. पॅनलमधील विजयी उमेदवारांनी आज मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. त्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या वेळी मंत्री श्री. उदय सामंत देखील उपस्थित होते.

उदय सामंत म्हणाले. अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूक आहे. याची माहिती देण्यासाठी आपण पवार यांना भेटलो, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी काही प्रश्नांवर सामंत भाष्य केले. सत्तासंघर्षाची बाजु आमच्या वकीलांनी भक्कमपणे मांडली आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील आणि पुढचे मुख्यमंत्रीच असतील, असे सामंत म्हणाले. तसेच खारघर दुर्घटनेवर ते म्हणाले, कोरोनाच्या काळातील मृत्यू झाले. त्याचे गुन्हे कुणावर दाखल करायचे, असा सवाल केला.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आम्ही विकास करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. कोण वृत्तपत्रातून टीका करत आहेत, ते सगळ्यांनाच माहित आहे. ते काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. अजित पवार यांची विचारधारा वेगळी आहे. त्यांनी त्यांची विचारधारा बदलली तर त्यांच्याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी हे त्याबाबत निर्णय घेतील, असे सामंत म्हणाले. दरम्यान, पवार यांच्या भेटीमागे मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version