काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जंगल भागात शनिवार पहाटे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. तसेच, या भागात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.

या बाबत माहिती देताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, चमकीचे नेमके ठिकाण नामीबिया आणि मार्सर दरम्यानचे दाचीगाम वन क्षेत्र असल्याचे सांगण्यात आले आहे. जवानाना मिळालेल्या माहितीच्या आधारे जवानांनी संबंधित परिसरात शोधमोहीम सुरू केली, तेव्हा या ठिकाणी दडून बसलेल्याआरोपींनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यानंतर चकमकीस सुरूवात झाली. जवानांकडून देण्यात आलेल्या चोख प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले.काश्मीर झोन पोलिसांनी टि्वट करुन ही माहिती दिली. सध्या शोध मोहिम सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version