सेल्फीच्या नादात खोल दरीत कोसळून दोघांचा मृत्यू

सेल्फीच्या नादात खोल दरीत कोसळून दोघांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कावळेसाद येथे सोमवारी संध्याकाळी सहच्या सुमारास सेल्फी काढण्याच्या नादात दोन पर्यटकांचा 500 ते 600 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. 

 

इम्रान गारदी आणि प्रताप राठोड अशी दरीत कोसळलेल्या दोघांची नावं आहेत. सोमवारी रात्री उशिरा आंबोली पोलीस स्थानकात दोघे जण दरीत पडल्याची तक्रार नोंदवण्यात आली. 

 

त्यानंतर मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून शोधकार्य सुरु करण्यात आले. बाबल अल्मेडा आणि त्यांच्या टीमने सुमारे दोन तास चालत जाऊन दोघांचा शोध घेतला.

 

यावेळी इम्रान गारदीचा मृतदेह हाती लागला. मात्र, प्रताप राठोड याचा शोध अद्यापही सुरुच आहे. या शोधकार्यात कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाचेही प्रयत्न सुरु होते.

आज सकाळी प्रताप राठोडचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पाऊस आणि दाट धुकं यामुळे शोधकार्यात बराच व्यत्यय येत होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version