कोरोनाचा आमिओक्रॉन या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. देशात आमिओक्रॉनचा शिरकाव झाला असून कर्नाटकमध्ये आमिओक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आमिओक्रॉनच्या दोन रुग्णांमधील एका रुग्णाचे वय ६६ आहे तर एक रुग्णाचे वय ४६ असून आमिओक्रॉन रुग्णाच्या बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
केरळ आणि महाराष्ट्रात सध्या १० हजार ऍक्टिव्ह रुग्ण असून देशातील एकूण कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांपैकी ५५ टक्के रुग्ण या दोन राज्यांमध्ये असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. यावेळी आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीकरणात वाढ झाल्याचेही सांगितले आहे. देशात नागरिकांना सव्वाशे कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या. तर एकूण ४९ टक्के नागरिकांचे दुहेरी लसीकरण पूर्ण झाल असून ७९ टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.