सोशल मीडियावर सध्या लाईव्ह स्ट्रीमिंगचा वापर जास्त वाढलाय. या लाईव्ह स्ट्रीमला यूजर्सकडून सर्वांत जास्त प्रतिसाद मिळतोय. यूट्युब लाईव्ह आणि फेसबुक लाईव्हला सर्वाधिक पसंती दिली जाते. मात्र ट्विटरनेही आता लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी नवं फिचर आणलं आहे.
ट्विटरने युजर्सना लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी वेगळं क्षेत्र पुरवलं जाणार असल्याची माहिती दिली आहे. लाइव्ह स्ट्रीमिंगची सुविधा आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही प्लेस्टोअर्समध्ये याचं अॅप अपडेट करता येणार आहे. लवकरच युजर्सना ट्विटरवरील न्यूज फीडमधील उजव्या बाजूला सगळे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहेत. यूजर्स फॉलो करत असणाऱ्या अनेक अकाउंट्समधील लाइव्ह स्ट्रीमिंगची सुविधा एकाच वेळी पाहता येणार असल्याची माहिती एका ट्विटद्वारे मेण्यात आली आहे.
याशिवाय ज्या युजर्सना हे नवं अॅप अपडेट करणं शक्य नसेल, तर अशा युझर्ससाठी ट्विटरचं ‘लाइट’ व्हर्जनही उपलब्ध होणार आहे. तसेच ट्विटरवर यूजर्सच्या ऑनलाईन वापराची माहिती लवकरच देण्यात येईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.