जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे, त्यांची तूर 5 हजार 50 रुपये हमीभावाने खरेदी केली जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली.
एकूण तूर खरेदी 11 लाख टन आहे. यापैकी एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक 4 लाख टन म्हणजे 45 टक्के तूर खरेदी करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मार्च महिन्यापर्यंत शेतकरी केंद्रावर माल आणतात. मात्र त्यानंतर व्यापारी माल घेऊन माल घेऊन येतात, याबाबत केंद्राने चिंता व्यक्त केली. मात्र शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी तूर विक्री करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असं आश्वासन केंद्राला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
व्यापाऱ्यांकडे तुरीला साडे तीन ते चार हजार रुपये भाव आहे. मात्र सरकार नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर 5 हजार 50 रुपये हमीभावाने तूर खरेदी करणार आहे. यासाठी सरकार एक हजार कोटी रुपये अधिकचे उपलब्ध करून देईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.