मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरही तूर खरेदी केंद्र बंद

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरही तूर खरेदी केंद्र बंद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तूर खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरही नाफेडचे तूर खरेदी केंद्र बंदच आहेत. 22 एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राबाहेर रांगा लावल्या.

 

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर अद्यापही आदेश जारी करण्यात आलेला नाहीये, त्यामुळे नाफेडचे तूर खरेदी केंद्र बंदच आहेत. दरम्यान तूर उत्पादक शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. औरंगाबाद खंडपीठात शेतकऱ्यांनी सरकारविरोधात याचिका केली. त्यावर 2 मे रोजी सुनावणी होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version