तुळजापूर दुमदुमले शाकंभरी जलयात्रेने

तुळजापूर दुमदुमले शाकंभरी जलयात्रेने

जय महाराष्ट्र न्यूज, तुळजापूर

तुळजापुरात शाकंभरी नवरात्र जल यात्रा सुरु आहे. यावेळी तुळजापूर दुमदुमलेले दिसले. तुळजा भवानीच्या शाकंभरी नवरात्रीतील मुख्य आकर्षण ठरली ती जल यात्रा. या जल यात्रेत मोठ्या प्रमाणात सुहासीनी सहभागी झालेल्या दिसल्या.

या जल यात्रेचा मुख्य उद्देश्य म्हणजे, दुष्काळ निवारण अन्नदान म्हणजेच जलपूजन असा आहे. त्यासाठी देवीला वेगवेगळ्या 64 भाज्यांचा नैवेद्य तसेच, वेगवेगळ्या 44 फळांचा नैवेद्य दाखवला जातो.

तसेच, पापनाश तिर्थातील जल हे कलशा ठेवले जाते.  देवीची मूर्ति रथामध्ये ठेऊन वाजत गाजत तिची पापनाश तिर्थ येथुन ते तुळजा भवानीच्या मुख्य मूर्तीपर्यंत मिरवणुक काढली जाते. ही सर्व धूम या जल यात्रेत पाहायला मिळते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version