Tukaram Mundhe: मुंबईत मोठी कारवाई; आता व्यापारी तुकाराम मुंडेंच्या रडारवर, हजारो किलो भेसळयुक्त मिठाई-मावा जप्त

जप्त केलेल्या मालाची बाजारातील किंमत अंदाजे 3 लाख 60 हजार 380 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
Tukaram Mundhe: मुंबईत मोठी कारवाई; आता व्यापारी तुकाराम मुंडेंच्या रडारवर, हजारो किलो भेसळयुक्त मिठाई-मावा जप्त

अन्नातील भेसळीविरोधात राज्यभर कठोर कारवाई करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत मुंबईतील भेसळखोर व्यापाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत सुमारे 1,328 किलो संशयित भेसळयुक्त मिठाई आणि मावा जप्त करण्यात आला.

मुंबईतील गिरगाव आणि कुंभारवाडा परिसरात एफडीएच्या पथकाने अचानक छापेमारी करून ही कारवाई केली. जप्त केलेल्या मालाची बाजारातील किंमत अंदाजे 3 लाख 60 हजार 380 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. डी. एम. मावावाला (DM Mavawala) येथून सुमारे 1,239 किलो संशयित मिठाई आणि मावा जप्त करण्यात आला आहे. तसेच विजयकांत यादव या व्यापाऱ्याकडून 89 किलो संशयित माव्याचा साठा जप्त करण्यात आला.

छापेमारीदरम्यान या दोन्ही ठिकाणी मिठाई आणि मावा अत्यंत अस्वच्छ पद्धतीने साठवले जात असल्याचे समोर आले. याशिवाय पॅकिंगवरील लेबलिंग नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले होते आणि अन्नपदार्थ टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या तापमान नियंत्रणाचा पूर्णपणे अभाव असल्याचेही आढळून आले.

दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, एफडीएने उत्पादक आणि व्यापाऱ्यांना कठोर सूचना दिल्या आहेत. दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक स्वच्छ वातावरणात आणि योग्य तापमान नियंत्रणाखालीच केली जावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नियमांचे पालन करणे सर्वांसाठी आवश्यक असून याबाबत काटेकोर दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version