Tukaram Mundhe: ‘रुग्णांची लूट थांबवा, अन्यथा कठोर पावले उचलू’; तुकाराम मुंढेंचा हॉस्पिटल्सना सज्जड दम

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
Tukaram Mundhe: ‘रुग्णांची लूट थांबवा, अन्यथा कठोर पावले उचलू’; तुकाराम मुंढेंचा हॉस्पिटल्सना सज्जड दम

तुकाराम मुंडे सध्या अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. भेसळ करणाऱ्यांवर तसेच गुटखा विक्रेत्यांवर निशाणा साधल्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा रुग्णालयांकडे वळवला आहे. आता  रुग्णांना औषधे आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच आत असणाऱ्या अधिकृत फार्मसीमधून (मेडिकल) खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठा दणका दिला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये तुकाराम मुंडे म्हणाले की,  "हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट ॲडमिट असेल, तर त्याला लागणारी औषधे त्याच हॉस्पिटलच्या फार्मसीमधून घेण्याची सक्ती केली जाते. मात्र  कायद्यानुसार कोणतीही संस्था किंवा रुग्णालय रुग्णांना अशी सक्ती करू शकत नाही. बाहेरून औषधे आणायची  की नाही हे आता रुग्ण ठरवेल. कोणावरही कोणीही सक्ती करू शकत नाही. औषध कुठून खरेदी करायचे, हा नागरिक आणि पेशंटचा मूलभूत अधिकार आहे."

त्याचप्रमाणे, मुंढे यांनी स्पष्ट केले की, रुग्णालयातील डॉक्टरांना रुग्णाला लागणाऱ्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन नातेवाइकांच्या हातात देणे बंधनकारक राहील. ते प्रिस्क्रिप्शन घेऊन नातेवाइकांना त्यांच्या सोयीनुसार आणि परवडणाऱ्या दरानुसार कोणत्याही बाहेरील नोंदणीकृत मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. जर एखाद्या औषधाचा विशिष्ट ब्रँड उपलब्ध नसेल, तर रुग्ण बाहेरील मेडिकलमधून उपलब्ध असलेले जेनेरिक पर्यायही निवडू शकतात.

त्यामुळे आता सर्व रुग्णालयांनी या नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. जर कोणत्याही रुग्णालयाने रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना त्यांच्याच फार्मसीमधून औषधे घेण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भाग पाडले, तर नागरिक याविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) थेट तक्रार नोंदवू शकतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version