पीएमपीएलचे 158 कर्मचारी बडतर्फ; तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

पीएमपीएलचे 158 कर्मचारी बडतर्फ; तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सतत गैरहजर राहणाऱ्या बसचालकांवर मोठी कारवाई केलीय. तुकाराम मुंढेंनी एकूण 158 बसचालकांना बडतर्फ करत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.  तुकाराम मुंढे हे आपल्या कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. पुण्यात आल्यापासून त्यांनी वाहतूक व्यवस्थेत सुधारणेच्या दृष्टीने मोठी पावले उचलली.

तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 4 मे 2016 रोजी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामाविरोधात धडक कारवाई करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात पालिकेत एकमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर त्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. सध्या पीएमपीएमएलमधीलही त्यांच्या कामाचा धडाका नेहमीच चर्चेत असतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version