धडाकेबाज कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढेंना नाशिकमध्येही विरोध

धडाकेबाज कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढेंना नाशिकमध्येही विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

आपल्या धडाकेबाज कारवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढेंविरोधात नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसण्याची तयारी केलीय. नाशिकच्या आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर मुंढेंनी कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संघटनांच्या माध्यमातून बंड पुकारलाय.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली नाही, तर रस्त्यावर उतरू, असा इशारा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आणि नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी दिलाय. तर मी केलेली कारवाई अन्यायकारक आणि चुकीचं असल्याचं सिद्ध करावं, असं आव्हान आयुक्त मुंढेंनी दिलंय. तसेच, कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई होणारच, अशी ठोस भूमिका त्यांनी घेतली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version