‘अजित पवार सोबत आल्याने त्रिशूळ तयार’

‘अजित पवार सोबत आल्याने त्रिशूळ तयार’

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी :   उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे पहिल्यांदाच गडचिरोली येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात एका व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदे सरकारचा ९ वा शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाची गडचिरोली मध्ये जय्यत तयारी करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच पारंपारीक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. अजित पवारांचा शपथविधी झाल्यांनतर तिघेही पहिल्यांदाच एकत्र एका व्यासपीठावर आले होते. त्यानंतर हे तिघे काय बोलतात याकडे सगळ्यांचाच लक्ष लागून होत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले की ९ वर्षे विकासाची वर्षे होती, ९ वर्षात देशाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. मोदी आपली टीम चांगल्या प्रकारे तयार करत आहेत. राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असेल तर विकास कामे करण्यात मदत होईल. असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांचं कौतुक काण्यात आलं.

फडणवीस म्हणाले की ‘अजित पवार आमचे जुने साथी व मित्र आहे. ते आता एकनाथ शिंदे व आमच्यासोबत सत्तेत सहभागी झाल्याने आमचे त्रिशूळ पूर्ण झाले आहे. आमचे त्रिशूळ हे विकासाचे आहे. हे त्रिशूळ राज्याची गरीबी दूर करेल’, असं मत त्यांनी व्यक्त केलं. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून शासनाकडून ४५ लाख लाभार्थ्यांना मदत करण्यात आली आहे.अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली. या कार्यक्रमातून लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, रिक्षा तसेच कर्ज वाटप आदी सहाय्य केले जाते. त्यामुळे या कार्यक्रमासाठी गडचिरोलीच्या दुर्गम भागातूनही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version