वृत्तसंस्था, नवी दिल्ली
त्रिपुरातील आदिवासी भागात गरिबीने खचलेल्या पित्याने 200 रुपयांसाठी आपल्या आठ महिन्याच्या मुलीला रिक्षा चालकाला विकल्याची घटना त्रिपुरात घडलीय.
तेलियामुरातील महारानीपूर येथील आदिवासी पाड्यावरील ही धक्कादायक घटना घडलीय. गरिबीला कंटाळून मुलीला विकण्याचे कठोर पाऊल उचलले, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले.
एकीकडे केंद्र सरकारकडून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना राबवली जात असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या मन पिळवटून टाकणा-या घटना समोर येतंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.