Beed Warkari Accident: पंढरपूरहून परतीचा प्रवास ठरला शेवटचा! एकाच वेळी वाहनांचा तिहेरी अपघात; इंजिनचे दोन तुकडे, तर 11 जण…

बीड जिल्ह्यातील केज-कळंब मार्गावरील साळेगाव येथे पंढरपूरहून परतीचा प्रवास करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण तिहेरी अपघात झाला आहे.
Beed Warkari Accident: पंढरपूरहून परतीचा प्रवास ठरला शेवटचा! एकाच वेळी वाहनांचा तिहेरी अपघात; इंजिनचे दोन तुकडे, तर 11 जण…

बीड जिल्ह्यातील केज-कळंब मार्गावरील साळेगाव येथे पंढरपूरहून परतीचा प्रवास करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण तिहेरी अपघात झाला आहे. ट्रॅक्टर, क्रुझर आणि कार या तीन वाहनांचा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरचे पुढील इंजिनाचे हेड दोन तुकड्यांत विभागले गेले आणि कारच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. यादरम्यान एका वृद्ध वारकऱ्याचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या साळेगाव येथे रात्री सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर, क्रुझर आणि कार यांचा भीषण तिहेरी अपघात झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील संत राघोजी महाराज संस्थान, बोराळा येथील ह.भ.प. नरहरी नारायण वानखेडे महाराज यांच्या परतीच्या दिंडीचा ट्रॅक्टर केजच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या क्रुझरची जोरदार धडक ट्रॅक्टरला बसली.

हेही वाचा- Amravati ST bus Accident : चालक केबिनमध्ये अडकला, ट्रकची काच फोडून….; अमरावतीत एसटी बस आणि ट्रकची भीषण धडक! 10 जण गंभीर

तर त्यानंतर मागून येणारी कारही अपघातग्रस्त वाहनांवर जोरदार आदळली. यादरम्यान सात वारकरी आणि क्रुझरमधील चार जण असे एकूण 11 जण जखमी झाले आहेत. जखमींवर केज, कळंब आणि अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका वृद्ध वारकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच आसपासचे ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले तसेच जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, मृत वारकरी आणि जखमी हे वाशिम जिल्ह्यातील असल्याने त्यांची ओळख आणि नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version