Maharashtra Earthquake : महाराष्ट्र हादरलं! नांदेड, परभणीत जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के; हिंगोलीत भूकंपाचे केंद्र

Maharashtra Earthquake : महाराष्ट्र हादरलं! नांदेड, परभणीत जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के; हिंगोलीत भूकंपाचे केंद्र

हिंगोली : मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यांत आज मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटांनी रिश्टर स्केलवर अंदाजे 4.4 तीव्रतेचा भूकंप झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भूकंपाचे केंद्र हिंगोली शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावरील हिंगोली – बसमत परिसरात असल्याचे सांगितले जात आहे. 

हेही वाचा : Teachers Protest: शिक्षकांचे उद्या ‘शाळा बंद’ आंदोलन; शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सामूहिक रजेवर; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या

मोबाईलवरील Android Earthquake Alerts System द्वारे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अंदाजे 4.4 इतकी नोंदविण्यात आली आहे. तर राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अंदाजे 4.1 इतकी आहे. धक्के बसताच अनेक नागरिक झोपेतून घाबरून बाहेर पडले. काही ठिकाणी घरांमधील पंखे, दरवाजे, खिडक्या आणि इतर वस्तूंना हलके कंपन जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले.

सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येण्याची शक्यता आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version