रेल्वे प्रशासनाच्या अर्जात आता मेल-फिमेलसह ‘टी‘ या अक्षराचा समावेश

रेल्वे प्रशासनाच्या अर्जात आता मेल-फिमेलसह ‘टी‘ या अक्षराचा समावेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तृतीयपंथीय वर्गासाठी भारतीय रेल्वे सरसावली आहे. रेल्वे बोर्डाने तृतीयपंथीयांना हक्काचे स्थान देण्याकरिता एक पाऊल पुढे टाकले आहे. आरक्षण आणि रद्द करण्याच्या अर्जात ‘मेल’ – ‘फिमेल’ यांच्यासह ‘ट्रॉन्सजेंडर’ म्हणून ‘टी’ या इंग्रजी आद्याक्षराचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तृतीयपंथीयांच्या हक्काबाबत रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला होता.

पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिमला देखील ऑनलाइन आरक्षण प्रक्रियेत ‘टी’ या आद्याक्षराचा समावेश करण्यास सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version