१२ एप्रिलपर्यंत ‘या’ मार्गावरील गाड्या रद्द  

१२ एप्रिलपर्यंत ‘या’ मार्गावरील गाड्या रद्द  

टाटानगर रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या कोटशिला जंक्शन येथे आदिवासी कुर्मी समाजाचे आंदोलन आणि खेमसुली रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे हावडा मार्गे ये-जा करणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. येत्या १२ एप्रिल दरम्यान हावडा मार्गे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत.

हावडा-मुंबई, हावडा-पुणे, हावडा-चेन्नई, हावडा-अहमदाबाद मेल, एक्स्प्रेस, गितांजली, समरसता अशा विविध गाड्या ७ एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. आंदोलकांनी रेल्वे रुळाची प्रचंड हानी केल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे. रेल्वे रुळाचे काम पूर्वपदावर आणण्यासाठी किमान पाच दिवस लागणार आहे. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. १२ एप्रिलपर्यंत हावडाहून येणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, १२ एप्रिलपर्यंतच्या गाड्यांचे आरक्षण शुल्क प्रवाशांना परत दिले जात आहे. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर पैसे परत घेण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version