Western Railway : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, विरारकडे जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या

पश्चिम रेल्वे वरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली भाईंदर ते विरार यादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे रेल्वे उशिराने धावत आहे.
Western Railway : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, विरारकडे जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या

पश्चिम रेल्वे वरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली भाईंदर ते विरार यादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे रेल्वे उशिराने धावत आहे. यामुळे दादर वरून विरार भाईंदर ला जाणाऱ्या गाड्या या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. आज सकाळी 7.52 च्या सुमारास भाईंदर आणि नायगाव रेल्वे स्थानकादरम्यान विरारकडे जाणाऱ्या मार्गावरील ओव्हेयरहेड वायरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला.

त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे सुरुवातीला दोन लोकल आणि एक मेमू (MEMU) गाडी मार्गावर अडकून पडल्या होत्या. सध्या वसई रोड स्थानकावरून तांत्रिक तज्ज्ञांची टीम आणि विशेष टॉवर वॅगन घटनास्थळी दाखल झाली असून रेल्वेच्या तांत्रिक विभागाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.

तसेच दादर ते माटुंगा या दरम्यान एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. एका अज्ञात तरुणाला रेल्वेची धडक बसल्याने जागेच त्याचा मृत्यू झाला घटनास्थळी मुंबई पोलीस तसेच रेल्वे पोलीस अधिकारी पोहोचले आणि त्या व्यक्तीला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version