राजापेठ उड्डाणपुलावरील वाहतूक तीन दिवस बंद

राजापेठ उड्डाणपुलावरील वाहतूक तीन दिवस बंद

अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच उड्डाणपुलावर बसवू असा इशारा आमदार रवी राणा आणि त्यांच्या समर्थकांनी दिला. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा उड्डाणपूल गुरुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून २० तारखेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला आहे. तर उड्डाणपुलावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

नियमाला अनुसरून राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या प्रस्तावाला महापालिकेने मंजूरी दिली आहे.

राजापेठ उड्डाणपुलावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी आणि छत्री तलाव परिसरात महाजारांचे स्मारक उभारणीचा प्रस्ताव सभागृहात मंजूर केल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर चेतन गावंडे तसेच ठरावाल पाठिंबा देणारे नगरसेवक आणि त्यासाठी राजीनामा देणाऱ्या युवा स्वाभिमानच्या नगरसेवकांचे आमदार रवी राणा यांनी आभार मानले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version