‘लवकर निघा, हळू चालवा व सुखरूप पोहोचा’ वाहनचालकांना सुरक्षित प्रवासासाठी ही म्हण म्हणजे एकप्रकारे संदेश देण्यात आलेला आहे. मात्र यानंतरही बहुतांश वाहनचालक याकडे दुर्लक्ष करून व नियमांना तुडवून भरधाव वेगात वाहन चालवितात व यातूनच अपघात घडतात. घडलेल्या अपघातांमध्ये ९० टक्केपेक्षा जास्त अपघात वाहनांच्या भरधाव वेगामुळे झाल्याचे समजून आले आहे. अशात गोंदिया जिल्हात विविध मार्गांवर गत १२० दिवसांमध्ये ८० अपघातांत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर स्वरूपाच्या २७ अपघातांत ५६ जण जखमी झाले आहेत. ही आकडेवारी वाहनधारकांसाठी चिंता वाढविणारी आहे. यावरून ‘अति घाई अन् संकटात नेई’ अशीच स्थिती सध्या दिसून येत आहे. प्रत्येकाला वाहनाला लवकर जाण्याची घाई झालेली असते. गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख मार्गांचे रूपांतर आता राष्ट्रीय महामार्गामध्ये झाले आहे. शिवाय, रस्त्यांचा दर्जाही सुधारल्याने गुळगुळीत रस्ते झाले आहेत. या रस्त्यावरील वाहनांचा वेग मात्र आता अमर्याद वाढला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.