जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कॅन्सरसारख्या भयंकर आजारावर मात करुन क्रिकेट क्षेत्रातील फलंदाजीत नाव कमावलेला युवराज सिंगचा आज 36वा वाढदिवस आहे.
2011च्या वर्ल्डकपमध्ये युवराजने सहा बॉलवर सहा सिक्सर अशी फलंदाजी करुन भारतीयांच्या मनात आपले ठसे उमटवले.
युवराजच्या वाढदिवसाची तारीख ही 12 असून महिनाही 12वा त्यामुळे युवराज 12 नंबर लकी मानतो.
आणि म्हणूनच 12 नंबरची जर्सी घालतो. कॅन्सरसारख्या आजारातून बाहेर पडल्यानंतर युवराज सिंगने कॅन्सरग्रस्तांसाठी YouWeCan नावाच्या संस्थेची स्थापना केली. ही संस्था कॅन्सरपिडितांची मदत करते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.