‘आज किंवा उद्या आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार’; मलिकांचे नवे ट्विट

‘आज किंवा उद्या आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार’; मलिकांचे नवे ट्विट

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा ट्वीट करुन सरकारी पाहुण्यांची माहिती दिली आहे. ‘आपल्या घरी आज किंवा उद्या सरकारी पाहुणे येणार आहेत’, असे ट्विट नवाब मलिकांनी केले आहे. मलिकांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नवाब मलिकांनी ट्विट केले की, ‘आमच्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करू. स्वत:वरच्या कारवाईचे भाकीत करताना आम्ही घाबरणार नाही. त्यामुळे या कारवाईचे भय न बाळगता आम्हाला लढायचे आहे. ‘गांधी गोऱ्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू’ असे ट्विट मलिकांनी केले आहे.

नवाब मलिकांनी केलेल्या ट्विटमुळे आता नवाब मलिकांवर ईडी कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. अनिल देशमुख, हसन मुश्रीफ यांच्यानंतर आता नवाब मलिकांवर ईडी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवाब मलिकांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे आता नवाब मलिकांवर ईडीची धाड पडणार असल्याची शक्यता दिसत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version