मुंबई, १५ जून २०२३ , प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील गाजलेला कलाकार अर्थात छोट्या पडद्यावरील ज्युनिअर नाना पाटेकर अभिनेता तीर्थानंद राव याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सध्या कलाविश्वात खळबळ उडाली आहे. तीर्थनंद राव याने चक्क समाज माध्यमावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने त्याचा थोडक्यात जीव वाचला.
तीर्थानंद राव याने मीरा रोड येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. फेसबुकवर लाईव्ह येत त्याने आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याने कीटकनाशके मारण्याचे औषध घेतले. यादरम्यान पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तीर्थानंदचा जीव वाचवला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून आता त्याची प्रकृती स्थिरावली आहे. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, “मला खरंच जगायचं नाही. त्या महिलेच्या त्रासाने मी वैतागलो आहे. जर पोलीस वेळीच आले नसते तर कदाचित मी आज जिवंत नसतो.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.