नवी मुंबईतही ३१ डिसेंबरला कडेकोट बंदोबस्त

नवी मुंबईतही ३१ डिसेंबरला कडेकोट बंदोबस्त

राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने महानगर पालिका आणि पोलिसांकडून निर्बंध घालण्यास सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावल जाहीर केली असून नवी मुंबईतसुद्धा ३१ डिसेंबरला कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

नवी मुंबईकरांनी ३१ डिसेंबरच्या जल्लोषासाठी सोसायटीच्या गच्चीवर पार्टीचा बेत केला असेल तर सावधान…कारण सोसायटीच्या पार्किंगमध्ये किंवा गच्चीवर नविन वर्षाचे सेलिब्रेशन करणार असाल तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच पोलिसांकडून अचानक छापामारी करून दारू पिणाऱ्यांवर आणि दंगा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. त्याचसोबत अटकेची कारवाईदेखील होऊ शकते. शहरातील प्रत्येक रस्त्यावर आणि चौकात पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने ठेवला जाणार आहे.

काय आहेत नवे नियम?

  • सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ५० लोकांना परवानगी
  • लग्न सोहळ्यांसाठीही केवळ ५० लोकांना परवानगी
  • अंत्यसंस्कारासाठी केवळ २० लोकांच्या उपस्थितीला अनुमती
  • राज्यातल्या तमाम पर्यटनस्थळांवर जमावबंदी लागू
  • स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version