शेतात काम करतांना वाघाने केला हल्ला; एकेका अवयवाचे तोडले लचके

शेतात काम करतांना वाघाने केला हल्ला; एकेका अवयवाचे तोडले लचके

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर

चंद्रपुरात वाघानं महिलेचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सिंदेवाहीतल्या गांगीझोरा परिसारत ही घटना घडलीये. कमल निकोडे असं मृत महिलेचं नाव आहे.

त्या शेतात काम करत असतांना वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. या परिरात वाघाची दहशत आहे.

मात्र, वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.

तर या वाघाला शोधण्यासाठी कॅमेरे लावण्यात येणार असल्याचं वनपाल करंडे यांनी सांगितलंय. तर, मृताच्या कुटुंबाला 25 हजारांची मदत देण्यात आलीये.

मृत अवस्थेत सापडलेल्या कमल निकोडे यांचे हात, पाय, हृदय हे शरीरापासून वेगळे झालेले पाहायला मिळाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version