दहशतवादी हल्ल्यासाठी होत होता या अॅपचा वापर, इसिसच्या संशयित दहशतवाद्याकडून धक्कादायक खुलासा

दहशतवादी हल्ल्यासाठी होत होता या अॅपचा वापर, इसिसच्या संशयित दहशतवाद्याकडून धक्कादायक खुलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

घातपाताच्या कटाखाली मुंब्रा येथून अटक केलेला आयएसचा संशयित दहशतवादी नझीम शमशाद अहमद हा चॅटींग करण्यासाठी थ्रीमा नावाच्या अॅपचा वापर करत असल्याचा खुलासा झाला आहे.

 

शेअर केलेले मेसेज किंवा अन्य माहिती या अॅपच्या सर्व्हरमध्ये ‘सेव्ह’ होत नसल्यानेच आयसिससारखी दहशतवादी संघटना व्हॉट्सअॅप, स्काइप या अॅपऐवजी ‘थ्रीमा’सारख्या विचित्र अॅपचा उपयोग करत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

मागील सात ते आठ महिन्यांपासून नझीम शमशाद अहमद आयएसच्या या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. आयएसमध्ये तरुणांना भरती करण्याचेही त्याचे प्रयत्न होते.

 

विशेष म्हणजे सीरियातील आयएसचा हँड्लर शफी अरमार याच्याही ऑनलाइन ‘टच’मध्ये असल्याचेही सूत्रांनी सांगितले. व्हॉट्सअॅप किंवा स्काइपसारखे अॅप वापरल्यास ट्रेस होण्याची शक्यता आहे. परंतु, थ्रीमा अॅपवरील माहिती सर्व्हरमध्ये सेव्ह होत नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version