भाजपच्या ‘या’ तीन प्रवक्त्यांचं तात्पुरतं निलंबन!

भाजपच्या ‘या’ तीन प्रवक्त्यांचं तात्पुरतं निलंबन!

पक्षाची भूमिका मांडणाऱ्या भाजपच्या तीन प्रवक्त्यांना त्यांच्या पक्षानेच मौन बाळगण्यास सांगितलं आहे. अवधूत वाघ,राम कदम आणि मधू चव्हाण या तीनही प्रवक्त्यांना पदावरून तात्परतं निलंबित करण्यात आलं आहे.

मधू चव्हाण यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोप असल्यामुळे पक्षाने त्यांना तात्रतं निलंबित केलं आहे. 2002 ते 2017 या काळात लग्नाचं आमिष दाखवून मधू चव्हाण यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप चिपळूण येथील शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या महिलेने केला असल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

तर राम कदम यांना दहीहंडीदरम्यान महिलांसंदर्भात केलेलं बेताल वक्तव्य भोवलं आहे. ‘एखादी मुलगी तुम्हाला पसंत आसेल, आणि ती जर लग्नाला तयार नसेल, तर मला सांगा, मी त्या मुलीला पळवून आणायला मदत करतो’ असं आक्षेपार्ह वक्तव्य राम कदम यांनी जाहीरपणे केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आता पक्षानेही त्यांना निलंबित केलं आहे.

प्रवक्ते अवधूत वाघ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती महागात पडल्याचं दिसत आहे. मोदी हे साक्षात भगवान विष्णूंचा अकरावा अवतार असल्याचं ट्विट अवधूत वाघ यांनी केलं होतं. या वादग्रस्त ट्विटनंतर वाघ यांनाही पदावरून तात्पुरतं निलंबित व्हावं लागलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version