विजय चिडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेच्या आतापर्यंत तीन बैठका संपन्न झाल्या आहेत. मात्र तिन्ही बैठका निष्फळ ठरल्याच्या पाहायला मिळाल्या आहे. आता आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. कोणत्या प्रभागात कोणत्या पक्षाकडे ताकदवान उमेदवार आहेत, यावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. महायुतीचे घोडे मुंबईत अडले असून, जोपर्यंत मुंबई महापालिकेचा निर्णय होत नाही, तोपर्यंत छत्रपती संभाजीनगरचा तिढा सुटणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर महत्त्वाच्या ठिकाणी महायुतीने एकत्रित लढावी यासाठी भाजपा, शिवसेनेत्यांच्या वरिष्ठ पातळीवरती भेटीगाठी सुरू आहेत, या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांनीही आता महायुतीमध्ये लढवण्याचा निर्णय घेत असल्याचे पाहिला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकावा, यासाठी महायुतीचे नेते कामाला लागले आहेत. महापालिकेसाठी जागा वाटपाचा प्रस्ताव शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी भाजपा समोर ठेवला आहे.
शिवसेना आणि भाजपा यांच्या तीन बैठका झाल्या. परंतु युती झाली नाही. कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या हे अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रत्येक निवडणुकीचं काम वेगळं असतं, या सर्व निवडणुकीवरून आम्ही एक धडा घेतला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत युतीमध्ये लढायला पाहिजे. एकमेकांमध्ये खटके उडणार नाहीत, याची देखील काळजी आम्ही घ्यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.
नुकताच नगरपरिषदेमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार यांनी स्वातंत्र्य निवडणूक लढवली असल्यामुळे जिल्ह्यात त्यांना मोठा फटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, याच ठिकाणी निवडणुकीपूर्वी शिवसेनेची जिल्हाभर ऐकल सत्ता होती. परंतु यावेळी शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ दोन जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर भाजपाला एकाच ठिकाणी विजय मिळवण्यात यश आले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटालाही एकच जागा मिळाली. त्यामुळे महायुतीला छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगलाच फटका बसला आहे. आम्हाला महायुतीची सत्ता आणायची आहे. त्यामुळे एखाद-दोन जागा इकडेतिकडे होतील. मोठा भाऊ, छोटा भाऊ अशी काही चर्चा झालेली नाही. आमच्याकडे आचारसंहित ठरली आहे. भाजप सेनेतील एकमेकांच्या पक्षात जाणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री अतुल सावे यांनी दिले आहे
आजपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये तीन बैठका संपन्न झाल्या. या बैठकीस पालकमंत्री संजय शिरसाट, भाजपाचे मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे यांच्यासह आमदार संजय केणेकर, किशोर शितोळे, आमदार प्रदीप जयस्वाल भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना या दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. परंतु या तिन्ही बैठकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्या युतीचा तोडगा निघाला नाही, त्यामुळे तिन्ही बैठका निष्फळ ठरल्या आहेत. आज पुन्हा शिवसेना आणि भाजपाची चौथी महत्त्वाची बैठक पार पाडणार आहे. आजच्या बैठकीमध्ये भाजप आणि शिवसेनेचा तोडगा निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार, जर युती झाली तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा सुटणार आणि इतर मित्रपक्षांना किती जागा महायुती ठेवणार याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.