Thane Crime : ठाणे हादरलं! एकीकडे भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घातला, तर दुसरीकडे भरदिवसा तरुणाला संपवलं; नागरिकांमध्ये भीती

Thane Crime : ठाणे हादरलं! एकीकडे भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घातला, तर दुसरीकडे भरदिवसा तरुणाला संपवलं; नागरिकांमध्ये भीती

ठाणे : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आधी बीड नंतर पुणे आणि आता ठाण्यामध्ये गुन्ह्यांच्या घटनांची नोंद मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परप्रांतियांकडून एका वृद्धाला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर ठाण्यात दोन हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. मासुदा तलाव परिसरामध्ये एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील नेहमी गर्दीने फुललेल्या मासुदा तलाव परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. तलावाच्या परिसरात एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : BEST Bus Accident: चुकून एक्सीलेटर दाबून गाडी फिरविली? दादर बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी अपडेट

मृत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

दरम्यान, बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ⁠DAV शाळेजवळ एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. साहिल पांचाळ असं मृत मुलाचं नाव आहे. साहिल पांचाळ (वय 19)  नावाच्या विद्यार्थ्यांची किरकोळ कारणावरुन हत्या करण्यात आली. ⁠शाळेमधील मुलांची कुठल्या तरी कारणावरून मारामारी झाली होती. त्यानंतर या टोळक्याने साहिल पांचाळ यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. साहिल पांचाळ याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. साहिलची हत्या का करण्यात आली होती, याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणे पोलीस करत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version