विरार मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना एकाच घरातील तिघांचा मृत्यु झाला आहे. या मध्ये एक पुरुष महिला व तीन महिन्याचा बाळाचा समावेश आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,रेल्वे रुळ ओलांडताना वेगात येणाऱ्या मेल ने तिघांना जोरदार धडक दिली असून या अपघातात पती पत्नी व त्यांचा तीन महिण्याच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांची ओळक अजून पटली नसून ते उत्तरप्रदेश चे असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.