शिर्डीत साई समाधी शताब्दी उत्सवाची तयारी सुरू

शिर्डीत साई समाधी शताब्दी  उत्सवाची तयारी सुरू

शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या पुण्यतिथी उत्सवाची साई संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. शिर्डीमध्ये १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान चालणाऱ्या साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाची तयारी  सुरू झाली आहे. साई मंदिराच्या ४ नंबर गेट समोर ६२ फुटांचं भव्य प्रवेश व्दार बनवण्याचं काम मुंबई येथील ‘द्वारकामाई’ मंडळ करत आहे. या प्रवेशव्दारावर साईबाबा तसंच अनेक देवांचे मूर्ती बसवण्याचे काम सुरु असून या प्रवेशव्दाराला ‘ब्राम्हांडनायक’ देण्यात येणार आहे. साई दर्शनास येणाऱ्या भक्तांसाठी हे एक आकर्षण ठरणार आहे.

शिर्डीमध्ये तीन दिवस साई समाधी शताब्दी उत्सव चालणार आहे. अनेक भक्त साईबाबा पुण्यतिथी उत्सवासाठी मुंबई आणि महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून पाई पालख्या घेऊन येत असतात. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांकरिता साई संस्थान कढून जेवणाची, राहण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि कार पार्किंगची व्यवस्था तीन दिवस मोफत करण्यात आली आहे. तसेच पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्रभर साई मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी उघडे ठेवण्यात येणार आहे. या साई भक्तांसाठी हरतऱ्हेच्या सुविधा देण्याचा प्रयत्न साई प्रशासन करत आहे.

१८ ऑक्टोबर २०१८ रोजी शिर्डीत साईबाबांच्या समाधीला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षीच्या साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला एक वेगळेच महत्व असल्याने साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी लाखो भाविक शिर्डीत येणार असल्याचे साई संस्थान कडून सांगण्यात आले आहे. मागील १ ऑक्टोबर २०१७ पासून साईबाबांच्या शिर्डीत साई समाधी शताब्दी उत्सवाला सुरुवात झाली. या समाधी शताब्दी उत्सवाचा समारोप १९ ऑक्टोबर २०१८ रोजी करण्यात येणार आहे. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहाणार असल्याची पालकमंत्री राम शिंदे यांनी माहिती दिली आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version