मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना धमकी

मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना धमकी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच फोन आल्याची माहिती आहे. हे सगळे फोन आजच आलेत. स्वातंत्र्यदिनी त्यांना असे धमकीचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. डी. बी मार्ग पोलीस स्टेशन इथं ते तक्रार दाखल केली आहे. रिलायन्स हॉस्पिटलच्या लॅन्डलाईनवरून ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. हे धमकीचे फोन करणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांकडून चौकशी

अंबानींना धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस अलर्ट झाले आहेत. त्यांनी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जात चौकशी केलीय. ज्या फोनवर फोन आणि ज्या व्यक्तीने फोन उचलला त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जात आहे. फोन करणारी व्यक्ती ही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती असल्याचं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून फोन करणारी व्यक्ती कोण याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

अंबानी यांना धमकीचे चार ते पाच फोन आले. या फोनची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे सगळे फोन आजच आलेत. स्वातंत्र्यदिनी त्यांना असे धमकीचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. येत्या तीन तासात अंबानी कुटुंबियांचा संपवणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांचं एक पथक रिलायन्स रुग्णालयात दाखल झालंय. या प्रकरणात रिलायन्स हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version