मुंबई : मुंबईतील माहीम येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. कॉलेजच्या प्राचार्या यांनी मुख्य नियंत्रण कक्षाला दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिस अॅक्टिव मोडमध्ये आले आहेत. कॉलेजच्या बाथरूममध्ये एक निनावी चिट्टी सोमवारी सापडली असून यात कॉलेजला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीबाबत लिहिले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कॉलेज परिसरात सर्च ऑपरेशन राबवले असता संशयास्पद काही आढळून आले नाही. त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणे हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.