24, 25 आणि 31 डिसेंबरला बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरु राहणार

24, 25 आणि 31 डिसेंबरला बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरु राहणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नाताळ आणि नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईत 24, 25 आणि 31 डिसेंबरला बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आलीये.

या निर्णयानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवता येणारयेत.

तसेच या तिन्ही दिवशी वाईन शॉपदेखील रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणारयेत. गृह खात्याने एक्साईज विभागाशी चर्चा करुन गुरुवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केलंय.

31 डिसेंबरच्या  पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही कंबर कसलीये. दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील गिरगाव, बँडस्टँड, मरीन लाइन्स, जुहू, नरिमन पॉइंट येथेही तरुणाई मोठ्या संख्येने गर्दी करत असते.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version