‘राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात’ – राजेश टोपे

‘राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात’ – राजेश टोपे

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांच्या उपस्थितीत पाच राज्यांची आढावा बैठक पार पडली. यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वरचढ आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

देशभरात कोरोना रुग्णांत वाढ होत असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना लसीकरण आणि कोरोना चाचणी वाढवण्यावर भर देण्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राज्यात लावण्यात आलेले निर्बंध हे विचारपूर्वक घेतले असून नागिरकांनी या कोरोना नियमांचे पालन करण्याची विनंती राजेश टोपे यांनी केली आहे.

दरम्यान, राजेश टोपे यांनी विलगीकरण कालावधीवरही भाष्य केले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा विलगीकरण कालावधी ७ दिवसांचा असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या कालावधीमध्ये कोणालाही सूट मिळणार नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच लसीकरण जास्त झालेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण अंत्यत कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version