चोरी यशस्वी झाल्याच्या आनंदात चोरट्याचा डान्स; पोलिसांच्या अटकेत

चोरी यशस्वी झाल्याच्या आनंदात चोरट्याचा डान्स; पोलिसांच्या अटकेत

बीड येथील जालना रोड येथे गोडावूनमधून 6 लाख 90 हजार रुपये किंमतीचा सिगारेट चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे चोरट्याने चोरी यशस्वी झाल्यामुळे नाच केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून बिलाल अब्दुल रज्जाक असे या आरोपीचे नाव आहे.

नेमकं काय घडलं ?

जालना रोडनजीक असलेल्या गोडावूनमधून 6 लाख 90 हजार रुपये किंमतीचे सिगारेट चोरी झाल्याची घटना घडली.

यामध्ये नावाजलेल्या सिगारेट कंपनींचे पाकिटे चोरी केल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, चोरी केल्यानंतर चोरी यशस्वी झाल्यामुळे चोरट्याने नाच केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

या नाचणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे.

बिलाल अब्दुल रज्जाक असे या आरोपीचे नाव असून तो केवळ 21 वर्षाचा असल्याचे समजते आहे.

पोलिसांनी दमदाटी केल्यानंतर बिलालने चोरी केल्याची माहिती दिली.

11 जुलै रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास ही चोरी केल्याचे समजते आहे.

या चोरट्याने सिगाकरेटचा माल चोरी करण्यासाठी गोडावूनची खोटी चावी बनवली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version