जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात दरोडे टाकून, खून करणाऱ्या अट्टल टोळीला अटक करण्यात आली आहे.
दौंड तालुक्यातील बोरीभडक मधील वृद्ध दांपत्याचा एप्रिलमध्ये खून करुन दरोडा टाकला होता. तसेच दौंड तालुक्यातील ठाकूर वस्ती,
खेरवाडी दौंड वस्त्यांमध्ये दरोडा टाकून घरातील लोकांना जबर मारहाण करुन घरातील ऐवज लंपास केला होता.
दरोडे टाकणारी टोळी दहा ते बारा जणांची असून यातील चार जणांना बारामती विभागाच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.
सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर इतर आठ जणांचा तपास गुन्हे शोध पथक करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.